एक लाखाच्या व्यवहारातून पर्‍याची आळी येथे तरुणावर प्राणघातक हल्ला

0

रत्नागिरी : शहरातील पर्‍याचीआळी येथे नागेश प्रकाश गजबार (वय २७ रा. कुवारबाव ) या तरुणावर धारधार कोयत्याने हल्ला करणार्‍या दोघांविरुद्ध खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा पोलीसांनी दाखल केला आहे. एक लाख रुपयांच्या व्यहारातून हा हल्ला झाल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलीस हल्ला करणार्‍या दोघांचा शोध घेत आहेत.

रत्नागिरी शहरानजीकच्या कुवारबाव येथे राहणार्‍या नागेश गजबार या तरुणाला त्याचे दोन मित्र शुभम सोळंखी रा.गवळीवाडा व महेश शेळके रा. शांतीनगर या दोघांनी फोन करून शहरातील पर्‍याचीआळी येथे बोलावले. परंतु नागेश पर्‍याचीआळी येथे आल्यानंतर त्यातील एकाने त्याच्या डोक्यात लादी घातली. त्यानंतर दुसर्‍या तरुणाने धारदार कोयत्याने नागेशच्या डोक्यावर, हातावर सपासप वार केले. त्यानंतर दोघेही घटनास्थळावरून पळून गेले होते.

स्थानिक नागरिकांनी नागेशला जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. नागेशवर अद्याप जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. नागेशने दिलेल्या तक्रारीवरुन पोलीसांनी शुभंम सोळंखी रा.गवळीवाडा व महेश शेळके रा. शांतीनगर या दोघांविरोधात खूनचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. तर दोघेही अद्याप गायब असून शहर पोलीस त्याचा शोध घेत आहेत. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक मनोज भोसले करत आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:48 AM 02/Dec/2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here