पेट्रोल पंपात चोरीप्रकरणी संशयिताला अटक

0

रत्नागिरी : पावस ते पूर्णगड मार्गावर गोळप येथील नायरा पेट्रोल पंपात कर्मचाऱ्याच्या बॅगेतील २२ हजार ५०० रुपयांची चोरी करणाऱ्या दोन संशयितांपैकी एकाला पूर्णगड पोलिसांनी अटक केली. गुरुवारी त्याला न्यायालयाने ३ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

HTML tutorial

मोहम्मद अली वल्द गुलाम हुसेन ऊर्फ हुसेन अब्बासी दालमा (४५, रा. लाजपत नगर, दक्षिण दिल्ली) असे पोलिस कोठडी सुनावण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. ही घटना १३ डिसेंबर २०२१ रोजी सायंकाळी ४.१५ वा. सुमारास पावस ते पूर्णगड मार्गावरिल गोळप येथील नायरा पेट्रोल पंपात घडली होती. त्यानुसार मुसद्दीक मुराद मुकादम ( ३२, गोळप, रनपार, रत्नागिरी) यांच्या मोटार (क्र. एमएच- ०५ सीयू ४२०४) या गाडीचा गोळप- वडवली या ठिकाणातील नायरा पेट्रोल पंपावर वापर करुन तेथे काम करणारा पेट्रोल सोडणारा (फिलर) आदीत्य माटल या कर्मचाऱ्याच्या पैशाच्या बॅगेतील रोख रक्कम २२ हजार ५०० पळवली होती.

या प्रकरणी मुसद्दीक मुकादम यांनी पूर्णगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. अज्ञात संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. यातील आरोपीने पेट्रोल पंपावर केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:05 PM 02/Dec/2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here