महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या लांजा तालुका अध्यक्षपदी किरण रेवाळे यांची निवड

0

लांजा : महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या लांजा तालुका अध्यक्षपदी किरण रेवाळे यांची निवड झाली आहे. या निवडीचे पत्र विद्यार्थी सेनेचे अमित ठाकरे यांच्या हस्ते रेवाळे यांना देण्यात आले.

‌लांजा तालुक्यातील भांबेड गावचे सुपुत्र असलेले किरण रेवाळे हे गेली अनेक वर्षे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सक्रिय कार्यकर्ते म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांनी कोविड काळात अनेकांना मास्क, धान्य वाटप केले आहे. तसेच गावांमध्ये एम एस सी बी चा डीआर आणला. विविध राजकीय, सामाजिक कामात नेहमीच पुढाकार असतो.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका जाहीर करण्यात आल्या आहेत. यामध्ये लांजा तालुका अध्यक्षपदी किरण रेवाळे यांची निवड झाली आहे. या निवडीचे पत्र मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांनी किरण रेवाळे यांना दिले असून आगामी काळात पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी कामाला लागा असे आवाहन त्यांनी केले आहे.

दरम्यान या निवडी बद्दल किरण रेवाळे यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:12 PM 02/Dec/2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here