कुणबी जोडो अभियानाचे लांजा तालुक्यात होणार स्वागत

0

लांजा : विखुरलेल्या कुणबी समाजाला एकत्र आणण्याच्या दृष्टीने संपुर्ण कोकणात राबवण्यात आलेल्या कुणबी जोडो या अभियानाचे लांजा तालुक्यात ३ डिसेंबर रोजी भव्य दिव्य स्वागत करण्यात येणार आहे.

या मात्रृसंघटनेच्या वतीने, संघटना प्रचार – प्रसार, सर्व कुणबी वाडी- वस्त्यांमध्ये संघटनेचे कार्य पोहचवणे, गाव तिथे शाखा असणे, सभासद वाढवणे, समाजात एकोपा टिकवून ठेवणे, परस्पर सहकार्याची भावना वृद्धिगत करणे, स्वाभिमानी समाज संस्कृती जोपासने, समाज जागृत करणे, समाजच्या विविध समस्या, अडीअडचणी समजावून घेऊन त्या सोडवण्याचा प्रयन्त करणे आदी विविध आणि उदात्त सामाजिक हेतूने कुणबी जोडो अभियान हा सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहे.
लांजा तालुक्यात हे अभियान शनिवार दिनांक ३ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी १०ः०० ते सायंः- ६ः०० या वेळात राबविण्यात येणार आहे. मुंबई – गोवा हायवेवर मठ या ठिकाणी सकाळी १० वाजता कुणबी जोडो रथाचे आणि समाजनेते, केंद्रीय पदाधिकारी याचे स्वागत केले जाईल. त्यानंतर सापुचेतळे, राजापूर कुणबी पतपेढी समोर सकाळी ११ वाजता सभा होईल. दुपारी १२ वाजता साटवली या ठिकाणी सभा होणार आहे. त्यानंतर दुपारी १.३० वाजता लांजा येथे बाईक रॅली काढण्यात येणार आहे. दुपारी ३.३० वाजता कुणबी पतपेढी समोरील पटांगण, लांजा येथे समाज बांधवांचा भव्य दिव्य मेळावा आयोजित करण्यात आला आहे

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:09 PM 02/Dec/2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here