रत्नागिरी : छुप्या मार्गाने जिल्ह्यात येणाऱ्यांची संख्या वाढल्याने ग्रीन झोन मध्ये असलेल्या जिल्ह्याची वाटचाल रेड झोन कडे होणार नाही ना, अशी भीती प्रत्येकाच्या मनात निर्माण झाली आहे. जिल्ह्यात नव्याने सापडलेले रुग्ण मुंबई, ठाणे आदी ठिकाणांहून आलेले असल्याचे निष्पन्न झाल्याने जिल्ह्याचे प्रवेशद्वार अधिक सुरक्षित करण्याच्या दृष्टीने जिल्ह्याच्या सीमेवर कशेडी घाटातील तपासणी नाका अधिक मनुष्यबळ देऊन मजबूत करण्यात आला असल्याची माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिली. याठिकाणी कर्मचाऱ्यांना अधिक अलर्ट राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
