रत्नागिरी : कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव आणि नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दुर्ष्टीने रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातील शहरी तसेच ग्रामीण भागातील प्रत्येक घरात सॅनिटायझर व मास्कचे वाटप करणार असल्याचे ना. सामंत यांनी सांगितले. सिंधुदुर्गचे पालकमंत्री असलेले श्री उदय सामंत हे रत्नागिरीवरही विशेष लक्ष ठेवून आहेत. रत्नागिरीचे पालकमंत्री adv. अनिल परब यांच्या संपर्कात राहून रत्नागिरी जिल्ह्याचीही जबाबदारी मोठ्या हिमतीने ना. सामंत पेलवत आहेत. आता कोरोनाच्या या पार्श्वभूमीवर रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातील नागरिकांसाठी आमदार निधीतून २५ लाखामधून शहरामध्ये प्रत्येक घरात सॅनिटायझर व चार मास्क, तर ग्रामीण भागात डेटॉल साबण आणि चार मास्क देणार असल्याचे ना. उदय सामंत यांनी सांगितले.
