मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आंगणेवाडीच्या श्री भराडी देवीचे घेतले दर्शन

0

मसुरे : सिंधुदुर्ग दौऱ्यावर असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शुक्रवारी दुपारी दक्षिण कोकणचे पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंगणेवाडी येथील श्री भराडी देवी चरणी नतमस्तक होत आशीर्वाद घेतले.

श्री देवी भराडी मातेच्या वार्षिक जत्रोत्सवा प्रसंगी भराडी मातेच्या मंदिराचे दर्शन भाविकांच्या गर्दी मुळे नीट घेता येत नाही, पण आज बारकाईने पाहताना मंदिराचे हे रूप मनमोहक आहे ! असे उदगार राज ठाकरे यांनी यावेळी काढले.

यावेळी अमित ठाकरे यांच्यासह नितीन सरदेसाई, बाळा नांदगावकर, शिरीष सावंत, जीजी उपरकर, तालुकाध्यक्ष विनोद सांडव, अमित इब्रामपूरकर, गणेश वाईरकर, विल्सन गिरकर, अमोल जंगले यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी आंगणेवाडी ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष भास्कर आंगणे यांनी राज ठाकरे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी दत्तात्रय आंगणे, जयप्रकाश आंगणे, अनिल आंगणे, रामदास आंगणे, सतीश आंगणे, विद्या आंगणे, बाबू आंगणे, नंदू आंगणे, दिनेश आंगणे, तनुराज आंगणे, गणेश आंगणे, समीर आंगणे, गौरव पालव, मंगेश आंगणे, संतोष आंगणे, कमलेश आंगणे यांच्यासह अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.

मनसेच्या रस्ते साधन सुविधा व आस्थापना सेलचे जिल्हा संघटक अमोल जंगले यांनी महाराष्ट्र सैनिकांसाठी अल्पोपहाराची सेवा उपलब्ध करून दिली होती. यावेळी जिल्ह्यातील मनसे कार्यकर्ते, पदाधिकारी तसेच मुंबई येथील मनसे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:10 AM 03/Dec/2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here