संगमेश्वरच्या आरोग्य केंद्राला आ. शेखर निकम यांच्याकडून इन्व्हर्टर

संगमेश्वर : संगमेश्वरच्या प्राथमिक आरोग्य केंद्राची गरज लक्षात घेऊन चिपळूणचे आमदार शेखर निकम यांनी वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर उपयोग व्हावा यासाठी इन्व्हर्टर उपलब्ध करून दिला. तो आरोग्य अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आला. आ. निकम यांनी तालुक्यातील आरोग्य यंत्रणेचा आढावा घेतला. त्यावेळी करोनाविषयक चाचणी, संबंधित रिपोर्टबाबतचे नियोजन याबाबतीत आरोग्य अधिकारी डॉ. सोनावणे आणि आ. शेखर निकम यांची चर्चा झाली. गेल्या आठवड्यात अवकाळी पावसामुळे संपूर्ण संगमेश्वर परिसरात वीजपुरवठा पूर्णपणे खंडित झाला होता. त्यामुळे करोनाच्या टेस्टिंग अहवालाचे काम पूर्णपणे ठप्प झाल्याचे डॉ. सोनवणे यांनी निकम यांना सांगितले. निकम यांनी ही आवश्यक गरज लक्षात घेऊन विजेअभावी कोरोना रिपोर्टसंदर्भात कोणताही विलंब आणि दिरंगाई होता कामा नये, अशी सूचना केली. तसेच आरोग्य विभागाला इन्व्हर्टर देण्याचे कबूल करून तातडीने संगमेश्वर आरोग्य अधिकाऱ्यांकडे तो सुपूर्द केला.

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here