उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख प्रवीण पांचाळ यांचा बाळासाहेबांची शिवसेनेत जाहीर प्रवेश

0

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे संगमेश्वर तालुकाप्रमुख सरपंच विवेक शेरे यांनी घेतला बाळासाहेबांची शिवसेनेत जाहीर प्रवेश

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत करबुडे जिल्हा परिषद गटातील बहुसंख्य सरपंचांनी घेतला बाळासाहेबांची शिवसेनेत प्रवेश

रत्नागिरी : उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख प्रवीण पांचाळ यांच्यासह करबुडे जिल्हा परिषद गटातील बहुसंख्य सरपंच यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत ‘बाळासाहेबांची शिवसेना’ पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला. आज या सर्वांनी ‘बाळासाहेबांची शिवसेना’ पक्षाचे उपनेते नामदार उदय सामंत यांच्या उपस्थितीत पाली येथे जाहीर प्रवेश केला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली युती सरकार सामान्य नागरिकांच्या हितासाठी कार्यरत आहे. शिंदे–फडणवीस सरकार हे आपले सरकार असल्याची जनभावना आहे. आज राज्यातील विविध भागातील इतर पक्षातील बहुसंख्य पदाधिकारी ‘बाळासाहेबांची शिवसेना’ पक्षामध्ये प्रवेश करीत असल्याचे श्री.सामंत यांनी यावेळी सांगितले.

माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी घेतलेल्या भूमिकेने प्रेरित होऊन राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे संगमेश्वर तालुकाप्रमुख सरपंच विवेक शेरे यांनी आपल्या समर्थकांसह काल नामदार उदय सामंत यांच्या उपस्थितीत संगमेश्वर येथे बाळासाहेबांची शिवसेना पक्षामध्ये जाहीर प्रवेश प्रवेश केला.

पक्षामध्ये प्रवेश करणाऱ्या सर्व पदाधिकाऱ्यांचे स्वागत करीत श्री. सामंत यांनी पदाधिकाऱ्यांना भविष्यकालीन सामाजिक आणि राजकीय कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:20 PM 03/Dec/2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here