गावी जाणाऱ्या इच्छितांसाठी मोफत वैदयकीय तपासणी व प्रमाणपत्र वाटप शिबीर

रत्नागिरी : लॉकडाऊनमुळे रत्नागिरी शहर व परिसरात अडकून पडलेल्या व गावी जाऊ इच्छिणारे तामिळनाडू, आंध्रप्रदेश, केरळ, कर्नाटक राज्यातील ५४० मुलांकरीता दि. ५ मे २०२० रोजी शांतीनगर, नाचणे; कोकणनगर, मिरजोळे या तीन ठिकाणी मोफत वैदयकीय तपासणी व प्रमाणपत्र वाटप शिबीर आयोजित करण्यात आले होते. नाचणे येथील डॉ. शिवदीप कीर तसेच कोकणनगर येथील डॉ. बुऱ्हाण दालायत, डॉ.कोकजे, डॉ.परवेज अन्सारी, डॉ. निखत अन्सारी यांनी कोविड १९ लक्षणांच्या अनुषंगाने वैद्यकीय तपासणी करून निस्वार्थी, समाजसेवी वृत्तीने कोणताही मोबदला न घेता योग्य प्रमाणपत्र वाटप केले. यावेळी मुलांच्या चेहऱ्यावर गावी जाण्याचा आनंद ओसंडून वाहत होता. याकामी रत्नागिरी पोलीस विभाग, नगरसेवक मुसा काजी, मुफ्ती तौफिक सारंग, जैन समाज संघटनेचे मुकेश जैन, मनोज जैन यांचे तसेच ग्रुप ग्रामपंचायत मिरजोळे व ग्रुप ग्रामपंचायत नाचणे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
11:42 AM 06-May-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here