मुंबई : राज्य सरकारने दारूची दुकाने सुरू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर मनसेने शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. राज ठाकरे यांची माफी मागणार का, असा बोचरा सवाल उपस्थित केला आहे. ‘राज ठाकरे यांनी गेल्या आठवड्यात वाइन शॉप सुरू करा, अशी मागणी केली होती. त्यावेळी राऊत यांनी संपादकीय लिहिले होते. त्यामुळे राऊतांना एक प्रश्न आता राज्य सरकारवर लेख लिहिणार की संपादकीय मागे घेऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची माफी मागणार? रडत राऊत उत्तर द्या, अशी टीका मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी केली आहे.
