जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना २४ समुपदेशक मार्गदर्शन करणार

रत्नागिरी : करोनाच्या पार्श्वभूमीवर शैक्षणिक परिस्थितीबद्दल राज्यातील विद्यार्थी आणि त्यांचे पालक संभ्रमात आहेत. या सर्वांना करियर तसेच विविध समस्यांबाबत समुपदेशन करण्यासाठी राज्य सरकारने जिल्हानिहाय मार्गदर्शक आणि समुपदेशकांची नियुक्ती केली आहे. रत्नागिरी जिल्ह्यासाठी एकूण २४ समुपदेशक हे काम करणार आहेत. या सर्व समुपदेशकांनी मुंबईतील व्यवसाय मार्गदर्शन आणि निवड संस्थेचा समुपदेशनाचा पदविका अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. हे समुपदेशक अनेक शाळा आणि संस्थांमध्ये वर्षभर विद्यार्थ्यांना करियरविषयक मार्गदर्शन करत असतात. राज्य शासनातर्फे दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी कलचाचणी आणि अभिक्षमता चाचणी घेतली जाते. या चाचणीचा निकाल नुकताच जाहीर झालेला आहे. या निकालासंदर्भात पालक व विद्यार्थांच्या समस्या असल्यास समुपदेशकांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. हे समुपदेशक मोफत मार्गदर्शन करणार आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यातील समुपदेशकांची नावे आणि त्यांचे संपर्क क्रमांक :

१) मिलिंद कडवईकर – ९७६७५६८७९८, २) गणेश कुलकर्णी – ९९७५१२९२३५, ३) प्रदीप यादव – ९७६७६०४८०६, ४) मंदार बापट – ९४२०७३१८१६, ५) रामदास सावंत – ९४२३३२३२७०, ६) मंगेश मोने – ९४०५५९५१२०, ७) विश्राम सूर्यवंशी – ९८८१९७५५९०, ८) अजित चव्हाण – ७५८८५७७०५१, ९) बळवंत देशमुख – ९४२३८५६०८८, १०) श्रीमंत शिरोळे – ९०७५२४६१७४, ११) भास्कर कदम – ९४२११४२०१८, १२) नारायण पाटील – ९४०५४३३२९३०, १३) संदेश रहाटे – ९६२३७६६५९३, १४) संदीप संदे – ९१४५६४६२६३, १५) रामचंद्र चव्हाण – ८२७५२८५२५९, १६) देशमुख सर – ९८२३६०९९७५, १७) प्रभाकर धोत्रे – ७०५७२८८६८४, १८) संदीप शिर्के – ९५५२०६४६४०, १९) रत्नप्रभा जोशी – ७९७२१५२६३१, २०) दीपक गमरे – ९२७१८९१४३३, २१) सुरेश डोणे – ९७६७५६९१७०, २२) धनाजी बेंद्रे – ८२७५४५६०२८, २३) जाधव सर – ८८८८००४७५७ आणि २४) पटेल सर – ९७६६८५४५७०.

जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या विनाशुल्क सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेच्या समन्वयक प्रा. वैशाली पाटील यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here