गर्दीमुळे मुंबईतील दारूची दुकाने आजपासून पुन्हा बंद

मुंबई : मुंबईत दारूच्या दुकानांबाहेर झालेली गर्दी लक्षात घेऊन पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी आपल्या विशेषाधिकारात कठोर निर्णय घेतला आहे. मुंबईत आजपासून दारूची दुकाने पुन्हा बंद ठेवण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी काढले आहेत. जीवनावश्यक वस्तू व औषधांची दुकाने सोडून मुंबईत इतर कोणतेही दुकान उघडण्यास मनाई राहिल, असे पालिका आयुक्तांनी आपल्या आदेशात नमूद केले आहे. आदेशाची संपूर्ण मुंबईत काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी. आदेशाचे उल्लंघन केल्यास त्यावर कलम १८८ अन्वये कठोर कारवाई करण्यात यावी, असेही नमूद करण्यात आले आहे.

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here