कोल्हापूर : जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाचे १६ रुग्ण आढळले असून त्यातील एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे तर ७ रुग्णांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे. एकाच दिवशी जिल्ह्यातील चार रुग्ण कोरोनामुक्त झाल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली. जिल्ह्यातील चारजण कोरोनामुक्त झाल्याचे मंगळवारी स्पष्ट झाल्याने कोल्हापूरकरांना दिलासा मिळाला.
