स्थलांतर करण्याऱ्या इच्छुकांची फिटनेस सर्टिफिकेटसाठी गर्दी

रत्नागिरी : परजिल्ह्यात आणि परराज्यात जाण्यासाठी शासनाने परवानगी दिल्यानंतर जाण्याआधी आरोग्य तपासणी करणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी शासकीय रुग्णालयातून तपासणी करणे आणि आपण शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त आहोत, याचे प्रमाणपत्र घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. असे फिटनेस सर्टिफिकेट मिळविण्यासाठी रत्नागिरी येथील जिल्हा रुग्णालयात मंगळवारी सकाळपासून एकच गर्दी झाली. पहिल्याच दिवशी साडेचारशे सर्टिफिकेट देण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बोल्डे यांनी दिली. आतापर्यंत तपासणी करण्यात आलेल्या साडेचारशे जणांमध्ये एकही संशयास्पद रूग्ण आढळून आला नसल्याचेही यावेळी डॉ. बोल्डे यांनी सांगितले.

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here