रत्नागिरी : वीजवाहिनी मध्ये स्पार्किंग झाल्याने तालुक्यातील नेवरे येथे घेवरचंद खेतमल जैन यांच्या आंबा बागेला आग लागून यामध्ये सुमारे २ कोटी ५४ लाख ९५ हजार रुपये नुकसान झाले आहे. या बागेतील सुमारे २ हजार ३०० आंबा झाडे, ७८५ काजू झाडे जळून खाक झाली आहेत. वीजवाहिनी मध्ये स्पार्किंग झाल्याने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. मंगळवारी सायंकाळी आंबा बागेतून जाणाऱ्या विज वाहिनीमध्ये स्पार्किंग झाल्याने त्याच्या ठिणग्या गवतावर पडल्या. त्यानंतर गवताने पेट घेतल्यामुळे आगीने रौद्ररुप धारण केले. त्यानंतर अग्निशामक दलाला बोलविण्यात आले. मात्र तोपर्यंत आंबा बाग जळून खाक झाली होती. या घटनेची माहिती मिळताच महावितरण मालगुंड विभागाचे सह अभियंता ऋषिकेश पाटील, पोलीस मनोज भितळे यांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
5:42 PM 06-May-20
