आमचा चौथा उमेदवार देखील आरामात निवडून येईल : फडणवीस

मुंबई : आमच्याकडे पुरेसं संख्याबळ आहे. त्यामुळे आम्ही चौथा उमेदवार देखील आरामात निवडून आणणार, असं वक्तव्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. भाजपचे तीन उमेदवार सहजपणे निवडून येऊ शकतात. तर आमची चौथी जागा निवडून येण्यात काहीही अडचण येणार नाही, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. येत्या 21 मे रोजी विधानपरिषदेच्या 9 जागांसाठी मतदान पार पडत आहे. 9 जागांसाठी होणारी विधानपरिषदेची निवडणूक ही सरळ सरळ भाजप विरूद्ध महाविकास आघाडी अशी होणार आहे. यामध्ये राष्ट्रवादीला 2, शिवसेनेना 2, काँग्रेसला 1, भाजपला 3 जागा मिळू शकतात. तर अखेरच्या नवव्या जागेसाठी मात्र चुरस आहे. याच जागेवर फडणवीसांनी आपला दावा केला आहे.

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here