रत्नागिरीत ओम पाडळकर फोटोग्राफी स्टुडिओचे उद्घाटन

0

रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील गाडीतळ येथील पाथरे कॉम्प्लेक्स येथे गुरुवार दिनांक १ डिसेंबर २०२२ रोजी ओम पाडाळकर फोटोग्राफी स्टुडिओचे उद्घाटन करण्यात आले.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ छायाचित्रकार आणि रत्नागिरी जिल्हा फोटो व्हिडियो व्यावसायिकांची सह संस्थेचे अध्यक्ष श्री अजय बाष्टे, तसेच सचिव सुबोध भुवड उपस्थित होते. त्याच बरोबर रत्नागिरीतील फोटो-व्हीडियो व्यावसायिक मंडळीने ही या समारंभाला उपस्थिती दर्शवली. उद्घाटन सोहळ्यात प्रमुख पाहुणे अजय बाष्टे यांनी स्टुडिओच्या कर्ताधरता ओम पाडळकर याला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

ह्या उद्घाटन समारंभाच्या शेवटी ओम पाडाळकर याचे वडील श्री. दीपक पाडळकर यांनी आभार प्रदर्शन केले. तसेच ओम पाडळकर यांचे सहकारी राधा दाते, वैभवी माळवदे, साई टिकेकर, पंकज मेस्त्री, आदित्य दशवंतराव, यश सावर्डेकर, अभिजीत सावर्डेकर, तैबा बोरकर ही उपस्थित होते.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:03 AM 07/Dec/2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here