गोगटे महाविद्यालयात डीएनए बारकोडिंग संबंधित आजपासून तीन दिवसीय कार्यशाळा

0

रत्नागिरी : येथील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात येत्या ७ डिसेंबर पासून दिवस डीएनए बारकोडिंगसंबंधित तीन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था आणि नॅशनल फॅसिलिटी फॉर बायोफार्मास्युटिकल्स यांच्या संयुक्त विद्यमाने ही तीन दिवसांची अध्यापक प्रशिक्षण कार्यशाळा होणार आहे.

डीएनए बारकोडिंग विज्ञानाचा परिचय करून देणे हे या तीन दिवसीय कार्यशाळेचे उद्दिष्ट असेल. ‘डीएनए बारकोड’ ही डीएनए क्रमामधील अशी अद्वितीय रचना आहे, की ज्यामुळे असंख्य जिवांमधून अपेक्षित सजीव ओळखता येणे सहज शक्य होते. व्याख्याने आणि प्रात्यक्षिके असे दुहेरी स्वरूप असलेल्या या कार्यशाळेमध्ये जैवविविधता, पर्यावरणशास्त्र, जैविक परिवीक्षण, प्रजातींचे वर्गीकरण अशा जीवशास्त्राशी निगडीत विविध विषयांची संकल्पना आणि विश्लेषणात्मक बाजू समजावून दिली जाईल.

या कार्यशाळेत कोकण विभागातील महाविद्यालये सहभागी होणार आहेत. सुमारे ४० अध्यापक आणि संशोधक विद्यार्थ्यांनी कार्यशाळेकरिता नोंदणी केली आहे. गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांनी कार्यशाळेला शुभेच्छा दिल्या आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:24 AM 07/Dec/2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here