तेलंगणा सरकारने 29 मे पर्यंत लॉकडाऊन वाढवला

हैद्राबाद : केंद्र सरकारने देशातील लॉकडाऊनचा कालावधी पुन्हा एकदा वाढवत तो 17 मेपर्यंत असेल असे जाहीर केले. मात्र तेलंगणा राज्याने ही मुदत आणखी 12 दिवसांनी वाढवायचा निर्णय घेतला आहे. तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांनी त्यांच्या राज्यातील लॉकडाऊनचा कालावधी आणखी वाढवत असल्याचे जाहीर केले आहे. तेलंगणामधील लॉकडाऊन 29 मे पर्यंत लागू राहणार आहे. मंगळवारी तेलंगणाच्या मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये लॉकडाऊन वाढवण्याबाबत निर्णय घेण्यात आला. लोकांना लॉकडाऊनचा कालावधी वाढवावा असे वाटत असल्याने आपण हा निर्णय घेत असल्याचे राव यांनी सांगितले.

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here