‘वेडात मराठे वीर दौडले सात’मधील अक्षय कुमारचा लूक पाहून संतापले नेटकरी

0

मुंबई : बाॅलिवूड अभिनेता अक्षय कुमार याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत वेडात मराठे वीर दौडले सात या चित्रपटामधील त्याचा फर्स्ट लूक व्हिडीओ शेअर केलाय.

या चित्रपटाची शूटिंग कालपासून सुरू झाली आहे मात्र, चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच हा चित्रपट वादामध्ये अडकलाय. महेश मांजरेकर हे या चित्रपटाला दिग्दर्शित करत आहेत. अक्षयने पोस्ट शेअर करताना लिहिले की, 6 डिसेंबरपासून वेडात मराठे वीर दौडले सात या चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात केलीये. शिवाजी महाराज यांची भूमिका करण्याचे साैभाग्य मला भेटले. त्यांच्या जीवनातून प्रेरणा घेऊन आणि माँ जिजाऊंच्या आशीर्वादाने मी सर्वतोपरी प्रयत्न करेल, असे अक्षयने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

अक्षय कुमारची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होताना दिसत आहे. अक्षयने शेअर केलेला त्याचा फर्स्ट लूक त्याच्या चाहत्यांना प्रचंड आवडला आहे. चाहते यावर अनेक प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.

अक्षय कुमारच्या या फस्ट लूक व्हिडीओला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल देखील केले जात आहे. एका युजर्सने कमेंट करत म्हटले आहे की, अक्षय कुमार हा शिवाजी महाराज यांची भूमिका करण्यास परफेक्ट नाहीये.

दुसऱ्या युजर्सने लिहिले की, हाच शिवाजी महाराज बनणार….हाच पृथ्वीराज बनणार…आणि अभिनय मात्र हाऊसफुल वाला करणार…हाच बाला देखील बनणार…बाॅलिवूडकडे दुसरे अभिनेतेच नाहीत…

इतकेच नाही तर अनेक युजर्स हे सोशल मीडियावर रडणारे इमोजी देखील शेअर करताना दिसत आहेत. अक्षय कुमार याने सोशल मीडियावर केलेली ही पोस्ट तूफान व्हायरल होताना दिसत आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:06 PM 07/Dec/2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here