रहदारीस अडथळा केल्याप्रकरणी वाहनचालकावर गुन्हा दाखल

पाली : रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावरील पाली बाजारपेठेत रहदारीस अडथळा निर्माण होईल अशाप्रकारे वाहन उभे केल्याप्रकरणी चालकाविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी सायंकाळी ६.४५ वा.सुमारास घडली. अनोज विकी पवार (रा.साठरेबांबर,रत्नागिरी) असे गुन्हा दाखल केलेल्या चालकाचे नाव आहे. सोमवारी सायंकाळी अनोज पवार यांनी आपल्या ताब्यातील महिंद्रा गाडी (एमएच-०२सीडब्ल्यू-३६६३) पाली बाजारपेठेत रहादारीस अडथळा होईल अशाप्रकारे पार्क केली होती. दरम्यान, पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली असता त्याच्याकडे वाहन चालवण्याचा परवाना आणि गाडीचा विमाही नव्हता. याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल होऊन ग्रामीण पोलिस अधिक तपास करत आहेत.

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here