रत्नागिरी : तालुक्यातील 29 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये सरपंच पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या 85 उमेदवारांपैकी 21 उमेदवारांनी माघार घेतली आहे तालुक्यात त्यामुळे सहा ग्रामपंचायती चे सरपंच बिनविरोध झाले आहेत तर 134 सदस्य बिनविरोध झाले आहे.
रत्नागिरी तालुक्यामध्ये 29 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सहा सरपंच बिनविरोध झाले असले तरी 23 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी 64 उमेदवार रिंगणामध्ये आहेत. या यातील काही ठिकाणी तिरंगी लढत होणार आहे.
बिनविरोध झालेले सरपंच निवळी, नेरूळ, वेळवंड, सत्कोंडी, बोंडये, करबुडे या गावातील आहेत. तालुक्यात 29 ग्रामपंचायतीमध्ये 422 उमेदवार सदस्य पदासाठी रिंगणात होते. यातील 249 सदस्यांपैकी 134 उमेदवार बिनविरोध झाले आहेत तर 115 सदस्य पदासाठी निवडणुकीच्या रिंगणात 355 उमेदवार आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:51 PM 08/Dec/2022
