बारसू रिफायनरी : सिद्धेश मराठे यांनी सुमारे १५० एकर जमिनीचे दिले संमत्तीपत्र

0

रत्नागिरी : राजापूर येथील शिवने खुर्द ग्रामपंचायत सदस्य शिद्धेश मराठे यांनी रिफायनरी व्हावी याकरिता स्वतःच्या सुमारे १५० एकर जमिनीची संमत्तीपत्र आज जिल्हाधिकारी यांच्याकडे सुपूर्त केली. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली रिफायनरी समर्थनाचा निर्णय घेतल्याचे सिद्धेश मराठे यांनी सांगितले.

या भागात रिफायनरी झाल्यास येथील ग्रामस्थांना मोठा फायदा होणार असून मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात आपल्या १२ मागण्या दिल्या आहेत. रिफायनरी विरोधकांनी केवळ एकच बाजू ऐकली, कंपनीची बाजू समजून घेतली नाही. ग्रामस्थांनी दोन्ही बाजू ऐकून निर्णय घ्यावा असे आवाहन सिद्धेश मराठे यांनी केले आहे. या भागातील जमीन मालकांनी पुढे येऊन प्रकल्प राबवण्यासाठी आवश्यक जमीन देऊन शासनाला सहकार्य करावे असे आवाहन देखील सिद्धेश मराठे यांनी याप्रसंगी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:24 PM 08/Dec/2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here