दुचाकी घसरून अपघात; तरुणाचा मृत्यू

0

गुहागर : अवघड वळणावर दुचाकीवरील ताबा सुटल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. तर अन्य एकजण जखमी झाल्याची घटना मढाळ येथे घडली.

दिनेश अनंत गुरव (32, कौंढर काळसूर, गुहागर) असे मृत्यूू झालेल्या तरुणाचे नाव आहे तर विश्वास सुभाष जोशी (गुहागर) असे मागील सीटवरील जखमी प्रवाशाचे नाव आहे. ही घटना 4 डिसेंबर रोजी दुपारी 3.30 वा. च्या सुमारास घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत दिनेश गुरव हा आपल्या ताब्यातील दुचाकीवरुन विश्वास जोयशी याला मढाळ ते बोर्‍या फाटा असा जात असताना मढाळ कारकरवाडी येथील अवघड वळणावर मयत दिनेश याचा गाडीवरील ताबा सुटला. ताबा सुटल्याने दुचाकी डाव्या बाजूच्या खोल चरात पडली. याम अपघातात दिनेश गुरव यांचा मृत्यू झाला. तर विश्वास याला लहान मोठया दुखापती झाल्या. अपघातात स्वतःच्या मृत्यूस व दुसर्‍याच्या दुखापतीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी मयत दुचाकीस्वार दिनेश गुरव याच्यावर गुहागर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:40 PM 08/Dec/2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here