एकाकी राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांनी आपली माहिती कळविण्याचे आवाहन

रत्नागिरी : कोरोनामुळे लॉकडाऊनचा कालावधी वाढला असून या कालावधीत नागरिकांना शिथिलता देण्यात आली असली तरी ६५ वर्षावरील नागरिकांनी बाहेर पडू नये, अशा स्पष्ट सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात एकाकी जीवन जगणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांनी आपली माहिती ज्येष्ठ नागरिक संघ व नजीकच्या पोलिस स्थानकात कळवण्यात यावी, असे आवाहन संघाचे अध्यक्ष सुभाष थरवळ यांनी केले आहे. ६५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांनी अत्यावश्यक सेवा आणि वैद्यकीय सेवा याशिवाय घरामधून बाहेर पडू नये, असे स्पष्ट केले आहे. काही भागात जीवनावश्यक सेवा घरपोच पुरवण्याची सुविधा नाही. त्यामुळे अशा ज्येष्ठ नागरिकांनी आपली माहिती ज्येष्ठ नागरिक संघ, नजीकचे पोलीस ठाण्याकडे कळवावी. त्याचप्रमाणे पोलिस नियंमत्र कक्ष ०२३५२/२२२२२२ याठिकाणी व ज्येष्ठ नागरिक संघ ९४२००४२४०९ याकडे संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here