सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ३२ ग्रामपंचायती बिनविरोध

0

सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील ३२५ पैकी तब्बल ३२ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. तर त्या ठिकाणी एकुण १२९ सदस्य बिनविरोध झाले आहे. यात मालवणमध्ये सात ग्रामपंचायती, तर वेंगुर्ला तालुक्यातील केवळ एकच ग्रामपंचायत बिनविरोध झाली आहे.

HTML tutorial

याबाबतची अधिकृत माहिती जिल्हा प्रशासनाच्या सामान्य महसुल शाखेच्या माध्यमातून देण्यात आली आहे.यात कुडाळमध्ये मांडकुली आणि कडावल या दोन ग्रामपंचायती, सावंतवाडीत गेळे आणि नेतर्डे या दोन ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. दोडामार्गमध्ये भेकुर्ली, मोर्ले, विर्डी या ग्रामपंचायती, वेंगुर्ला तालुक्यात पाल ही एकमेव ग्रामपंचायत बिनविरोध झाली आहे. वैभववाडी येथील जांंभवडे, उपळे, तिथवली, अरुळे, निमअरुळे, गडमठ या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. कणकवली मधील भरणी, पिसेकामथे, शिडवणे, वायंगणी, वारगांव, ओझरम या ग्रामपंचायती, देवडगमध्ये गवाणे, आरे, चाफेड, अगोवड, पाटगाव आदी गावांचा समावेश आहे. तर मालवण मधील साळेेल, आमडोस, बांदिवडेखुर्द, काळसे, कातवड, घुमडे, शिरवंडे आदी गावांचा समावेश आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:40 PM 08/Dec/2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here