रत्नागिरी : अपघातात मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांच्या वारसदारांना अथवा जखमी झालेल्या शेतकऱ्यांना गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत सानुग्रह अनुदान देण्यात येत आहे. खंडित झालेली ही योजना पुन्हा सुरू करण्यात आली असून या योजनेचा लाभ शेतकऱ्यांनी घेण्यासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाने केले आहे.
अनेकदा शेतकरी अपघातात मृत्युमुखी पडतो किंवा शेतकऱ्याला अपंगत्व येते. यामुळे त्याला मदतीची गरज असते. यामुळे गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत त्याला मदत केली जाते. यामुळे शेतकऱ्यांनी यासाठी अर्ज करण्याचे आवाहन
जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाने केले आहे. दरम्यान, आता ७ एप्रिल ते २२ ऑगस्ट २०२२ या कालावधीत अपघातात मृत्यू पावलेल्या अथवा अपंगत्व आलेल्या शेतकऱ्यांनी अथवा त्याच्या वारसदारांनी प्रस्ताव सादर केले नसल्यास आवश्यक कागदपत्रासह प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालय, मंडल कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहायक यांच्याशी तत्काळ संपर्क साधून विहित नमुन्यात व आवश्यक कागदपत्रांसह प्रस्ताव सादर करावेत, असे कृषी विभगाने सूचित केले आहे.
ही योजना ७ एप्रिल ते २२ ऑगस्ट २०२२ या कालावधीकरिता खंडित झाली होती. शासन निर्णयानुसार उपरोक्त कालावधीतील प्राप्त विमा दाव्यांना तपासणीनंतर मंजुरी देण्यात येणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:54 08-12-2022
