संचारबंदी काळात विनाकारण फिरणाऱ्या ६५४ वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई; १४० हून अधिक दुचाकी जप्त

मालवण : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन व संचारबंदी लागू केल्यानंतर शहरात दुचाकी वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली होती; मात्र याचे उल्लंघन केल्याप्रकरणी सुमारे १४० हून अधिक दुचाकी जप्त करण्याची कारवाई करण्यात आली आहे. याचबरोबर विनाकारण दुचाकी चालविणाऱ्या ६५४ वाहनचालकांवर सुमारे १ लाख ४६ हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. २३ मार्च ते २८ एप्रिल या कालावधीत ही कारवाई करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here