महाराष्ट्रातील परिस्थिती गंभीर ! केंद्रीय आरोग्यमंत्री लवकरच मुख्यमंत्र्यांशी करणार चर्चा

नवी दिली : देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून तो आकडा 49,000 वर पोहोचला आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रात तब्बल 15 हजारहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोना व्हायरसमुळे महाराष्ट्रात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी याबाबत चिंता व्यक्त केली आहे. तसेच यासंदर्भात केंद्रीय आरोग्य मंत्री बैठक बोलावून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत लवकरच चर्चा करणार असल्याची माहिती मिळत आहे. ‘महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांपैकी 34 जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील सध्याची स्थिती चिंता व्यक्त करण्यासारखी आहे. राज्यात होत असलेला कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी पुढे काय करता येईल यासंदर्भात आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठक बोलावणार आहोत. त्या बैठकीत आगामी नियोजनासंदर्भात कृती धोरण ठरवलं जाईल’, असं केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी म्हटलं आहे.

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here