मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी राज्य सरकार वेगवेगळ्या उपाययोजना करत आहे. मात्र, चाचण्यांचा वेग वाढल्यामुळं रुग्ण संख्या देखील वाढत आहे. अशा परिस्थितीत अधिकाधिक आयसीयू बेड्स उपलब्ध व्हावेत म्हणून रेल्वे, मुंबई पोर्ट ट्रस्ट, भारतीय लष्कर आणि इतर केंद्र शासनाच्या अखत्यारीतील रुग्णालये व संस्था काही दिवसांसाठी वापरण्यास द्यावेत, अशी विनंती राज्य सरकारनं केली आहे. या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वत: वरिष्ठ पातळीवर बोलत आहेत.
