सरपंच संसद कोकण विभाग समन्वयकपदी सुहास सातार्डेकर यांची नियुक्ती

0

गुहागर : एमआयटी, पुणे शिक्षणसंस्था समूहाच्या एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट अंतर्गत ‘एमआयटी- राष्ट्रीय सरपंच संसदे’ची स्थापना करण्यात आली आहे. गुहागरचे सामाजिक कार्यकर्ते सुहास सातार्डेकर यांची कोकण विभाग समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

या निवडीचे पत्र नुकतेच त्यांना देण्यात आले. राज्यातील पदाधिकाऱ्यांचे दोन दिवसांचे अधिवेशन व नियुक्तीपत्र आणि ओळखपत्र वितरण कार्यक्रम पुणे येथे झाला. या वेळी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. एमआयटी पुणे शिक्षण संस्था समूहाचे कार्यकारी अध्यक्ष राहुल कराड अध्यक्षस्थानी होते. ना. डॉ. भारती पवार यांच्या हस्ते सुहास सातार्डेकर यांना नियुक्तीपत्र आणि ओळखपत्र देण्यात आले.

देशाच्या पंचायतराज व्यवस्थेतील सर्व लोकप्रतिनिधींचे अराजकीय स्वरुपात संघटन करणे, त्यांचे सर्वांगीण प्रबोधन आणि त्यांना ग्रामविकासाची प्रक्रिया यशस्वीपणे राबवता यावी, यासाठी सहाय्यभूत होतील असे विविध उपक्रम अभ्यासपूर्वक राबवणे हे एमआयटी- राष्ट्रीय सरपंच संसदेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. सातार्डेकर यांच्या निवडीबद्दल कोकण विभागाचे अध्यक्ष संतोष राणे, रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अजय महाडिक, समन्वयक प्रभाकर खानविलकर व संघटक सौरभ जोगळे यांनी अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here