रत्नागिरी : महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर्स सेलच्या माध्यमातून राज्यभरात डॉक्टर्सना फेस प्रोटेक्शन शिल्डचे वाटप करण्यात आले. रत्नागिरीतही राष्ट्रवादीने हा उपक्रम राबवून शिल्डचे वाटप केले. कोरोना पार्श्वभूमीवर सुरक्षिततेची गरज ओळखून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या डॉक्टर्स सेलने उपक्रम राबवला. त्याचाच एक भाग म्हणून डॉक्टर्स सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ. संतोष दाभोळकर यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने डॉ. सेलचे डॉ. सतीशराजे सुर्वे यांच्याकडे ८० फेस शिल्ड देण्यात आले. आयएमएचे डॉ. निनाद नाफडे व डॉ. नितीन चव्हाण यांच्याकडे २४ फेस शिल्ड देण्यात आले.
