राज्यात अडकलेल्या लोकांना गावी सोडण्यासाठी मोफत एसटी सेवा : विजय वडेट्टिवार

मुंबई : राज्यातील विविध भागात लॉकडाउनमुळं अडकून पडलेल्या लोकांना त्यांच्या जिल्ह्यातल्या गावी पोहोचवण्यासाठी 10 हजार एसटी बस सोडण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे हा एसटीचा प्रवास मोफत दिला जाणार आहे, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टिवार यांनी दिली आहे. महाराष्ट्रात अडकलेल्या लोकांना आपापल्या जिल्ह्यातील गावी पोहोचवण्यासाठी मदत व पुनर्वसन विभागाकडून एसटी महामंडळाला निधी उपलब्ध करुन दिला जाणार आहे. पुढच्या दोन-तीन दिवसांत या माध्यमातून जवळपास 10 हजार बसेस सोडून या अडकलेल्या लोकांना त्यांच्या गावी सोडवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असं वडेट्टिवार यांनी सांगितलं आहे. दरम्यान, लोकांना तिकीटाचा कुठलाही भुर्दंड पडणार नाही, अशी भुमिका घेण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मदत आणि पुनर्वसन विभागाला केल्या आहेत, अशी माहितीही वडेट्टिवार यांनी दिली.

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here