रत्नागिरी : जिल्ह्यात कामथे आणि कळंबणी येथील दोघांना कोरोनाची लागण झाली असल्याचे निष्पन्न झाले आहे. जिल्ह्यात गेल्या चार दिवसात अकरा कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. आता जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 17 झाली आहे. हे दोघे मुंबई तुन आले होते त्यांना कोरोंटाईन करून ठेवण्यात आले होते.
