तीवराट येथील अपघातात ट्रक चालकावर गुन्हा दाखल

रत्नागिरी : ५ मे रोजी तिवराट चेकपोस्ट समोरील निवळी जयगड रोडवर झालेल्या दुचाकी आणि ट्रक यांच्यात झालेल्या अपघातात ट्रक चालक रेवळनाथ नवनाथ ढगे वय २३, पिंपळगाव याच्यावर रत्नागिरी ग्रामीण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुचाकी चालक दुर्वांकुर कृष्णकांत शीतप रा. खेडशी, रत्नागिरी हा जयगड ते निवळी असा जात असताना ट्रक चालकाने हुलकावणी दिल्याने ट्रकच्या मागील चाकावर आदळला होता. या अपघातात दुर्वांकुर शीतप हा जखमी झाला आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
12:04 PM 07-May-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here