भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या तरुणाला मारहाण प्रकरणी 5 जणांना अटक

0

खेड : तालुक्यातील चाकाळे येथील महालक्ष्मी मंदिरातील कार्यक्रमादरम्यान मैदानावर गावातील दोन गटात वाद झाला होता. ही घटना 6 डिसेंबर रोजी मध्यरात्री घडली होती. हा वाद सोडवण्यासाठी गेलेल्या तरुणाला 7 ते 8 जणांनी बेदम मारहाण केल्याची तक्रार रोहन राकेश खेडेकर (19, शिवशक्ती अपार्टमेंट, शिवतररोड, खेड) यांनी खेड पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानुसार पोलिसांनी 8 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यातील 5 जणांना शुक्रवारी अटक करण्यात आली.

पंकज वाडकर, सुमित बर्गे, सागर कदम, सुदर्शन पार्टे, अक्षय पार्टे या 5 जणांना पोलिसांनी अटक केली. शुक्रवार 9 डिसेंबर रोजी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांची जामिनावर सुटका केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिंचघर येथे 6 डिसेंबर रोजी मध्यरात्री 2.15 वाजण्याच्या सुमारास गावातील दोन गटात जोरदार वादावादी सुरु होती. यावेळी रोहन हा आइस्किम खात होता. महालक्ष्मी मंदिराच्या बाहेर ग्राऊंडवर जोरजोरात आवाज येत असल्यामुळे तो त्या ठिकाणी पोहोचला. तेथे 10 ते 12 जण रस्त्यावर वाद घालत होते. दोन गटातील वाद पाहून रोहन हा त्या ठिकाणी सोडवण्यासाठी गेला असता 10 ते 12 जणांनी शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. पंकज वाडकर, सुमित बर्गे, सागर कदम, सुदर्शन पार्टे, अक्षय पार्टे या 5 जणांनी हातातील कड्याने, काठीने डोक्यात कानाखाली मारहाण केली. या मारहाणीत रोहन हा जखमी झाला. त्याने खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी पंकज वाडकर, सुमित बर्गे, सागर कदम, सुदर्शन पार्टे, अक्षय पार्टे यांच्यावर भादविकलम 143, 143, 147, 149, 324, 504, 506, महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (ई) चे उल्लंघन केल्याप्रकरणी 135 प्रमाणे गुन्हा दाखल केला होता. त्यानुसार पोलिसांनी 5 जणांना अटक करून न्यायालयात हजर केले. न्यायालयाने अॅड अश्विन भोसले यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून 5ही जणांची जामिनावर सुटका केली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:14 10-12-2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here