संगमेश्वर तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत माखजन प्रशालेचं सुयश

0

माखजन : संगमेश्वर तालुक्यातील माखजन इंग्लिश स्कूल, माखजन व ऍड पी आर नामजोशी कला वाणिज्य विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी संगमेश्वर तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले आहे. या स्पर्धा देवरुख येथे मीनाताई ठाकरे विद्यालयातर्फे घेण्यात आल्या होत्या.

यामध्ये संगमेश्वर तालुका स्तरीय मैदानी स्पर्धेत १९ वयाखालील गटात,सुयश भागडे २००मीटर धावणे (द्वितीय), तेजस मुदगल थाळी फेक (द्वितीय)तर हातोडा फेक मध्ये तृतीय क्रमांक आला. श्रेया धामणस्कर लांब उडी (तृतीय) तर अडथळा पार करणे मध्ये प्रथम आली.

लीना शिंदे थाळी फेक (प्रथम)गोळा फेक (प्रथम), हातोडा फेक मध्ये द्वितीय आली.पायल गुरव थाळी फेक मध्ये तृतीय आली.तसेच जान्हवी भोजने गोळा फेक द्वितीय, हातोडा फेक मध्ये प्रथम क्रमांक पटकावला. अक्षद डिके ने हातोडा फेक व गोळा फेक मध्ये प्रत्येकी लरत्नम क्रमांक मिळवला. क्रिश भुवड ने हातोडा फेक(द्वितीय) सौरभ मुक्षे अडथळा पार करणे(प्रथम) तर तन्मय भुवड अडथळा पार करणे प्रकारात द्वितीय क्रमांक पटकावला. यशस्वी विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक निखिल वारके व अभिजित सुर्वे यांचे मार्गदर्शन लाभले.

यश संपादन केलेल्या विदयार्थ्यांचे मुख्याध्यापिका सौ रुही पाटणकर व संस्था अध्यक्ष आनंद साठे यांनी अभिनंदन केले आहे. तर परिसरातून ही अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:55 10-12-2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here