रत्नागिरी : विविध मार्गाने जिल्ह्यात रेडझोन मधून येणाऱ्या नागरिकांचे प्रमाण वाढतच आहे. जिल्ह्याला अशाच नागरिकांपासून सर्वात मोठा धोका आहे. जिल्हाधिकारी यांनी दिलेले आदेश डावलून मालवाहतुकीसाठी मिळालेल्या ई पासचा वापर करीत कामोठे नवी मुंबई येथून येगाव ता. चिपळूण येथे बोलेरो पिकअप गाडीतून प्रवासी वाहतूक केल्याप्रकरणी सय्यद शौकत बोदले वय ३२ रा. देवरुख कांजीवरे याच्यावर व प्रवासी ओंकार विनोद देसाई वय ३० रा. सध्या कामोठे यांवर अत्यावश्यक सेवेचा वापर करून रोग संसर्ग पसरवण्याची घातकीपणाची कृती केली म्हणून सावर्डे पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
12:14 PM 07/May/2020
