राज्य तायक्वांदो स्पर्धेसाठी रत्नागिरीचा संघ रवाना

0

रत्नागिरी : देवरुख येथे झालेल्या जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत सुवर्णपदक मिळवत राज्य स्पर्धेसाठी पात्र झालेले रत्नागिरीचे खेळाडू पुणे येथे होणाऱ्या 32 व्या महाराष्ट्र राज्य तायक्वांदो स्पर्धेसाठी रवाना झाले आहेत.

12 ते 14 डिसेंबर रोजी पुणे येथे या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या एसारके तायक्वांदो क्लबच्या अमेय सावंत, सई सावंत, समर्था बने या खेळाडूंना शाहरुख शेख यांचं मार्गदर्शन लाभले आहे. अनिकेत पवार हा गणराज तायक्वांदो क्लबचा खेळाडू असून त्याला प्रशांत मकवाना यांचं मार्गदर्शन लाभल आहे.

सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना तालुकाध्यक्ष राम कररा, उपाध्यक्ष मिलिंद भागवत, सदस्य शीतल खामकर, प्रदीप कीर तसच जिल्हाध्यक्ष व्यंकटेश कररा, उपाध्यक्ष विश्वदास लोखंडे, खजिनदार शशांक घडशी, सचिव लक्ष्मण कररा यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:06 12-12-2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here