चिपळूण : पायाखालील सिमेंटचा पत्रा फुटून खाली पडल्याने कामगाराचा मृत्यू

चिपळूण : थ्रीएम पेपर मिल खेर्डी चिपळूण येथे कंपनीचे मेंटेनन्स काम करताना पत्र्याच्या शेडवरून चालत जात असताना पायाखालचा सिमेंटचा पत्रा फुटून ३५ फुट खाली पडल्याने कामगार जितेंद्र दिनानाथ प्रसाद वय ३१, रा. उत्तरप्रदेश याचा गंभीर दुखापत होऊन मृत्यू झाला. या प्रकरणी गुप्ता फॅब्रीकेटर्स अँड फायबर वर्क्स चे मालक ओमप्रकाश गोरख गुप्ता, कंपनीचे मेंटेनन्स इंजिनियर पपाई कनाई सिंगा, वय ३४, रा.श्रीएम पेपर मिल, कंपनीचे व्यवस्थापक हसमुख मोरारजी संगोई, वय ६५ यांच्यावर चिपळूण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सिमेंटच्या पत्र्यावर कामगार चढवताना सेफ्टी बेल्ट तसेच शेडवर चढवण्यासाठी शिडी अगर इतर व्यवस्था न करताच यांनी कामगारास चढवले या निष्काळजीपणा व हयगईच्या कृत्यामुळे जितेंद्र प्रसाद यांचा मृत्यू झाला असा आरोप ठेवत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
12:47 PM 07/May/2020

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here