मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय नेत्यांची राजकीय बैठक बोलावली आहे. यांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे, विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर यांच्यासह 18 पक्षांच्या नेत्यांना या बैठकीचे निमंत्रण आहे. महाराष्ट्रात ‘कोरोना’चे संकट गडद होत असताना उद्धव ठाकरे सर्वपक्षीय नेत्यांची मते जाणून घेत आहेत. मुख्यमंत्री सध्याची कोरोना संदर्भातली सरकारची तयारी आणि राजकीय पक्षातील नेत्यांच्या सूचना आणि अपेक्षित सहकार्य याविषयी चर्चा करणार आहेत. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 18 राजकीय पक्षांच्या नेत्यांसोबत सल्लामसलत करणार आहेत. महाविकास आघाडीतील उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनाही निमंत्रण आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
2:47 PM 07-May-20
