गणेशोत्सवात चाकरमान्यांसाठी; डबल डेकरला तीन जादा डबे

0

रत्नागिरी : गणेशोत्सवात चाकरमान्यांच्या सोयीसाठी कोकण रेल्वे मार्गावरुन धावणारी वातानुकूलित डबल डेकरला वाढीव तीन डबे जोडण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे हे डबे चेअरकार ऐवजी थ्री टायर श्रेणीचे असतील. दि. १० ऑगस्ट ते १५ सप्टेंबर या कालावधीत डबल डेकरला हे जादा डबे जोडले जाणार आहे. रेल्वेच्या या निर्णयामळे गणपतीसाठी कोकणात येणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. लोकमान्य टिळक टर्निनस ते मडगाव दरम्यान धावणाऱ्या ११०८५/११०८६ तसेच ११०९९/१११०० या दोन डबल डेकर गाड्या सध्या आठ डब्यांच्या धावतात. गणेशोत्सवात कोकणात येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे ही वाढती गर्दी सामावून घेण्यासाठी रेल्वेने या दोन्ही गाड्यांना थ्री टायर दर्जाचे तीन जादा डबे जोडले जाणार आहेत. यामुळे जवळपास महिन्याभर या गाड्या आठ ऐवजी ११ डब्यांसह धावणार आहेत. त्यामुळे रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला याचा सर्वाधिक फायदा होणार आहे. यानुसार गाड्यांना चेअरकारचे ६ कोच, तीन थ्री टायर वातानुकूलित डबे तर दोन जनरेटर कार असे ११ डबे या गाड्यांना जोडले जाणार आहेत. यातील ११०८५/११०८६ या डबल डेकरला दि. १२ ऑगस्ट ते १० सप्टेंबर २०१९ तर ११०९९/१११०० दि. १० ऑगस्ट ते १५ सप्टेंबर २०१९ या कालावधीसाठी जादा डबे जोडले जाणार आहेत.

HTML tutorial
LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here