मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात, उपमुख्यमंत्री अजित पवार, शेकापचे जयंत पाटील आदि नेते उपस्थित होते. या बैठकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अनेक मुद्दे उपस्थित केले. ते म्हणाले की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दीच्या ठिकाणी सुरक्षा वाढवावी लागेल. तर सरकारी आरोग्य यंत्रणांवर ताण येऊ नये यासाठी छोटे दवाखाने सुरु करावे लागतील. तसेच परप्रांतीय मजूर जे बाहेर गेले आहेत, त्यांची तपासणी करुन, नोंदणी करुन पुन्हा महाराष्ट्रात घ्यावं. तर MPSC विद्यार्थ्यांना आपआपल्या घरी पोहोचवावं. अनेक विद्यार्थी आज कुठेनाकुठे अडकले आहेत. त्यामुळे त्यांना त्यांच्या घरापर्यंत पोहचवे आवश्यक आहे, असे राज ठाकरे म्हणाले. तर लॉकडाऊनचा एक्झिट प्लॅन काय? असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला.
