एमआयडीसीत लोखंडी साहित्याची चोरी

0

रत्नागिरी : एमआयडीसी येथील वेल्डींग वर्क्सच्या मागील बाजूस ठेवलेले ४ हजार २०० रुपयांचे साहित्य पळविणाऱ्या संशयिताविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मजिद कासम नाईक (वय ३१, रा. उद्यमनगर, राजापूरकर कॉलनी, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना बुधवारी (ता. ७) रात्री नऊच्या सुमारास रत्नसागर मरीन वर्कस नावाचे वेल्डींग वर्कशॉप ऑक्टेल कंपनीसमोर घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मारुती बिरु मानवर (वय ४८, ऑक्टेल कंपनी समोर, एमआयडीसी, रत्नागिरी) यांच्या रत्नसागर वर्कशॉपच्या आवारात अनधिकृत प्रवेश करून वर्कशॉपच्या आवारात पाठीमागील बाजूस ठेवलेले ७०० रुपयांचे पाईप, ७०० रुपयांचे चॅनेल, १ हजार ५०० रुपयांचा चॅनेल, एक हजाराचे लोखंडी बोटीचे इंजिन, ३०० रुपयांचे तुकडे असा सुमारे ४ हजार २०० रुपयांचे साहित्य संशयिताने पळविले.

या प्रकरणी मारुती मानवर यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास शहर पोलिस अंमलदार करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:37 13-12-2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here