चोरट्यांनी लांजातील केदारलिंग, गांगेश्वर मंदिरातील दानपेटी फोडल्या

0

लांजा : तालुक्यातील आरगाव गावचे ग्रामदैवत केदारलिंग आणि देवमळा येथील गांगेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरटयांनी 3 हजार 500 रुपयांचा रक्कम लंपास केली.

ही घटना 10 डिसेंबर संध्याकाळी 6.30 ते 11 डिसेंबर रोजी सकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबतची फिर्याद संदेश वामन खामकर (45, आरगाव, खालीलवाडी, देवमळा, लांजा) यांनी लांजा पोलीस ठाण्यात दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरगाव ग्रामदैवत असलेल्या केदारलिंग आणि देवमळा येथील श्री देव गांगेश्वर मंदिराच्या दरवाजाची कडी तोडून दोन्ही मंदिरातील 3500 रुपयांंची चोरी केली. ग्रामस्थांना सकाळी दोन्ही मंदिरातील दानपेटया फोडलेल्या दिसल्या. याप्रकरणी संदेश वामन खामकर यांनी लांजा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञातावर भादविकलम 454, 457, 380 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:03 13-12-2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here