नुसत्या बोंबा मारून काय होणार? एकत्रपणे केंद्राकडे जाऊन IFSC मुंबईत आणू; भाजपा नेत्याचं ठाकरे सरकारला आवाहन

मुंबई : आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र प्राधिकरण (IFSC) गांधीनगरला नेण्यासंबंधीची अधिसूचना केंद्र सरकारने काढल्यानंतर महाराष्ट्रात राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर IFSC गांधीनगरला करण्याचा निर्णय तत्कालीन काँग्रेस सरकारने घेतला होता असा आरोप भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी केला आहे. शेलार म्हणाले की, संसदेतील तत्कालीन अर्थमंत्री निर्मला सितारामन् यांचे भाषण स्पष्ट करते आहे की, IFSC गांधीनगरला करण्याचा निर्णय तत्कालीन काँग्रेस सरकारने घेतला. ते मुंबईला व्हावे म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारनेच प्रस्ताव पाठवून पाठपुरावा केला होता, असं आशिष शेलार यांनी सांगितले. IFSC मुंबईला व्हावे म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारनेच एकमेव प्रस्ताव पाठवला, तो आजही केंद्र सरकारकडे प्रलंबित आहे. त्यामुळे नुसत्या बोंबा मारण्यापेक्षा महाराष्ट्राने एकत्रपणे केंद्राकडे जाऊन IFSC मुंबईत झाले पाहिजे म्हणून सांगू या, असं आवाहन देखील आशिष शेलार यांनी सरकारला केलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here