मुंबई : सध्या रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे मुंबईतील रुग्णालये अपुरी पडत आहेत. मुंबईतील कोरोना व्हायरसच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे पालिकेने येत्या १५ दिवसांत महालक्ष्मी रेसकोर्ससह अन्य ठिकाणी कोरोना केअर सेंटर (सीसीसी २) उभारण्याचा निर्णय घेतला आहे. नव्या कोरोना केअर सेंटर्समुळे आणखी २१ हजार ७०० बेडस् उपलब्ध होतील. महालक्ष्मी रेसकोर्स, नेहरु विज्ञान केंद्र, बीकेसी येथील एमएमआरडीए मैदान, माहिम निसर्गोद्यान आणि गोरेगाव नेस्को येथे ही सेंटर्स उभारली जातील. यापैकी बीकेसी येथे कोरोना केअर सेंटरचे काम सध्या युद्धपातळीवर सुरु आहे. यामुळे दाटीवाटीच्या भागातील कोरोना संशियतांना इतरांपासून वेगळे ठेवता येईल.
