चिपळूण : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी जिल्हाबंदी तसेच संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या काळात लोकांना दुचाकी, चारचाकी वाहनांना निर्बंध घालण्यात आले आहेत. तरीही अनेक वाहनचालक संचारबंदीचे उल्लंघन करून रस्त्यावर वाहने घेऊन येतात. कोरोनामुळे असलेल्या लॉकडाऊनच्या काळात चिपळूण पोलिसांनी केलेल्या कारवाईत तब्बल १८ लाखांचा दंड वसूल केला आहे. १०६ वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे.
