जिल्हा परिषदेमार्फत आरोग्य तपासणी

0

ॲस्टर आधारच्या सहकार्याने कर्मचाऱ्यांसाठी खास उपक्रम

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा परिषद आरोग्य विभाग तसेच कोल्हापूर येथील ‘अॅस्टर आधार हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद कर्मचारी तसेच त्यांच्या नातेवाईकांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. एकूण २५० रुग्णांची तपासणी करण्यात आली.

श्यामराव पेजे सभागृहात आयोजित केलेल्या या शिबिरादरम्यान रक्तदान शिबिरही घेण्यात आले. आरोग्य शिबिराचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार यांचे हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. तर रक्तदान शिबिराचे उद्घाटन प्रकल्प संचालिका नंदिनी घाणेकर यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सावंत, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये, प्रकल्प संचालिका नंदिनी घाणेकर, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेंद्र गावडे उपस्थित होते. मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार यांचे हस्ते अॅस्टर आधारच्या सर्व वैद्यकीय पथकाचे स्वागत करण्यात आले. अॅस्टर आधार हॉस्पिटलचे समन्वयक डॉ. विजय सुवासे यांच्या नेतृत्वात तपासणी पथक उपस्थित होते.

जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून डॉ. बिष्णोई, डॉ. अक्षय वालिया, डॉ. संपत मीना, डॉ. स्वाती शेंडे, डॉ.उत्तम कांबळे, डॉ. संजय गावडे, डॉ. अंजली पाटील, डॉ. हरदास उपस्थित होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, कृषी अधिकारी अजय शेंडे यांच्यासह ५० कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:55 14-12-2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here